दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल येणार.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे.
प्रत्येक पक्षाने त्यांचे जाहीरनामे प्रकाशित केले आहेत
मविआ प्रत्येक महिलेला दर महिन्याला 3000 रुपये देणार तसेच महिलांना बसने मोफत प्रवास देणार.
शेतकऱ्यांना 3 लाखपर्यंत कर्जमाफी तसेच जे वेळेवर कर्जफेड करणार त्यांना 50000 रुपये प्रोत्साहन देणार.
प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा आणि मोफत औषधे देणार.
बेरोजगार तरुणांना दरमहा 4000 रुपये देणार.
जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.