यामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेट म्हणजेच वरिष्ठ सभागृहात विजय मिळवला आहे.
ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनंतर 2020 च्या निवडणुकीत जो बिडेन यांच्याकडून पराभूत झाले होते.
कमला हॅरिस यांच्या पक्षाने 224 जागा जिंकल्या आहेत. दोघांमध्ये केवळ 43 जागांचा फरक आहे.
विजयानंतर अमेरिकन जनतेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवणार आहे.
या दिवसासाठीच देवाने माझा जीव वाचवला होता. ट्रम्प यांच्यावर 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला झाला होता.
एक गोळी कानाला लागली आणि बाहेर गेली होती या हल्ल्यात त्यांचा जीव थोडक्यात बचावला होता.
निवडणुकीत विजय निश्चित झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेचे आभार मानले आहेत.
ट्रम्प 4 वर्षांनी व्हाईट हाऊसमध्ये परतणार आहेत. ते 2017 ते 2021 पर्यंत राष्ट्रपती होते.