बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दिवसभर प्रयत्न सुरू होते.
यंदाची दिवाळी महत्त्वाच्या नेत्यांनी, बंडखोरांची मनधरणी करण्यातच गेली.
या बंडखोरांमुळे महाविकास आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसू शकतो.
बंडखोरांच्या संदर्भात रविवारी दुपारी बैठक पार पडली.
कोणत्या मतदारसंघातून कोणी माघार घ्यावी यावर नियोजन करण्यात आले होते.
पक्षाच्या सर्व बंडखोरांशी वैयक्तिक संपर्क साधण्यात येत होते.
ज्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अशा बंडखोरांकडे नेतेमंडळींना पाठविण्यात आले होते.
बहुतांश नाराज बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.