शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता. त्यानंतर केंद्र सरकाककडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
दास यांना एक्स्टेन्शन मिळणार अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून सध्याला महसूल सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची नियुक्ती नव्या आरबीआय गव्हर्नरपदी करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलंय
संजय मल्होत्रा हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत.
मल्होत्रा यांची आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते हे पद सांभाळतील.
संजय मल्होत्रा हे 1990 बॅचचे राजस्थान केडरचे IAS (भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी) आहेत.
त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.
मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.