आज देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ ग्रहण करणार आहेत.

महायुतीचा भव्य शपथविधी आज मुंबईच्या आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे.

शपथविधी आज संध्याकाळी 5.30 वाजता पार पडणार आहे.

त्याआधी देवेंद्र फडणवीस देवदर्शनाला पोहोचले. फडणवीसांनी सिद्धीविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन घेतलं.

महायुती सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे.