ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते.
Image Source: facebook/sudhakarbadgujarshivsena
नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले.