संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानत अखेर आज (4 मार्च) धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेते आणि अजित दादांच्या अतिशय जवळचे नेते मानले जातात.

अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत एका ओळीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा घेण्यास उशीर झाला नाही का?

घटना घडून दोन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय,

यात दिरंगाई झाली असं वाटत नाही का?

असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित दादांनी यावर भाष्य करणं टाळले आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.