अण्णा हजारे म्हणाले की, हीच आम्ही अपेक्षा ठेवली होती तुमच्याकडून, नाईलाजास्तव आम्हाला बोलावं लागलं. एवढं प्रेम केलं तुमच्यावरती.
म्ही रस्ता सोडून गेलात म्हणून नाईलाजास्तव बोलावं लागलं.
अरविंद केजरीवाल यांना अनेक गोष्टी शिकवल्या.
मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही आणि राजकारणात गेले असे सांगत असताना झाले अण्णा हजारे भावुक झाल्याचं दिसून आलं.
अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली आहे.
सत्ता, पैसा, दारूची दुकानं डोक्यात गेल्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव झाला अशी टीका अण्णांनी केली.
अण्णा हजारे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि पक्ष काढला त्यावेळेस पासून मी त्यांच्याशी बोलणे बंद केले.
पक्ष काढल्यानंतर मी परत त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकले. कारण माझ्यापुढे पक्ष विरहित समाजसेवा, देशहित हेचं प्रधान्य होतं आणि आम्हाला तेच हवं आहे.