आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल देखील आपली जागा वाचवू शकले नाहीत.
पाटपरगंज मतदारसंघातून आपचे उमेदवार अवध ओझा पराभूत झाले.
पाटपरगंज मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांनी निवडणूक जिंकली आहे.
गेल्या निवडणूकीत मनीष सिसोदिया या मतदारसंघातून विजयी झाले होते.
मनीष सिसोदिया स्वतः जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले आहे.
पराभव स्वीकारताना अवध ओझा म्हणाले, हा माझा वैयक्तिक पराभव आहे, मी याची जबाबदारी घेतो.
मी पुढील विधानसभा निवडणूक पुन्हा पटपरगंजमधून लढवेन, असं अवध ओझा म्हणाले.
मी लोकांशी संपर्क साधू शकलो नाही, माझ्याकडे वेळ कमी होता .
एका महिन्यात, जेवढ्या लोकांशी संपर्क साधला तितकी मते मिळाली.