ध्रुव राठीचे यूट्यूबवर 2.5 करोड (फॉलोवर्स, सब्स्क्रायबर्स) आहेत.
ध्रुव राठीने महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करून आव्हान दिलं आहे.
व्हिडिओ पोस्ट करून ध्रुव राठी म्हणाला की जो नेता आव्हान स्वीकारेल आणि पूर्ण करेल,मी त्यांचा प्रचार करेन.
जर आव्हान पूर्ण केलं नाही तर माझ्यासोबत आणि माझ्या सब्स्क्रायबर्ससोबत गाठ आहे.
ध्रुव राठीने मिशन 'स्वराज' मध्ये महाराष्ट्रातील नेत्यांपुढे 8 आव्हाने ठेवली आहेत.
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे.
शेतकऱ्यांना चांगले प्रशिक्षण देणे, माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणे, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उभा करणे.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि मोफत चांगली आरोग्य व्यवस्था , नागरिकांना चांगली हवा आणि पाणी मिळावे.
राज्याला गुन्हेगारांपासून मुक्ती मिळवून द्यावी. सर्व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे.
छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रगतीसाठी मदत करणे, सर्वांना रोजगार मिळवून देणे.
ध्रुव राठीने नागरिकांनाही आव्हान केलं की, सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे.