दिल्लीतील अनेक जागांवर आघाडी घेत भाजपने बहुमत मिळवले आहे.
तर सत्ताधारी आम आदमी पार्टी पिछाडीवर आहे.
दिल्ली निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.
भाजपने दिल्लीत 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय, भाजपने दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते.
भाजपने आपल्या दुसऱ्या जाहीरनाम्यात तरुणांना 15000 रुपये देण्याची घोषणा केली होती.
दुसऱ्या जाहीरनामा अनुराग ठाकुर यांनी केला होता.
दिल्लीतील गरीब कुटुंबांना एलपीजी सिलेंडरवर 500 रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासनही दिले आहे.