जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. किशिदा यांनी यावेळी भारतीय अन्न पदार्थांचा आस्वाद घेतला.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पाणीपुरी खाऊ घातली आणि स्वत:ही पाणीपुरीवर ताव मारला. यावेळी त्यांनी लस्सीचाही आस्वाद घेतला.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कला भेट दिली.
यावेळी त्यांनी पाणीपुरी आणि लस्सी चाखली. दोन्ही नेत्यांनी पार्कच्या बाकावर बसून कुल्हडमध्ये म्हणजेच मातीच्या कपमध्ये लस्सीचा आस्वाद घेतला.
जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी दौऱ्यावेळी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला.
हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.
दोन्ही नेत्यांनी बुद्ध जयंती पार्कमधील बाल बोधी वृक्षाला भेट दिली. यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान मोदी यांनी येथे पाणीपुरी, लस्सी आणि कैरी पन्हाचा आस्वाद घेतला.
यावेळी पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी कोविड-19 महामारीनंतर शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगासाठी भारत-जपान धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी व्यापक चर्चा केली.