आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन रविवारी पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते. ट्युलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी आहे. ट्युलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान सुरू करण्यात आले विविध प्रकारच्या सुमारे 15 लाख फुलांची लागवड करण्यात आली महिनाभर गार्डन पर्यटकांसाठी खुले असणार आहे. ट्युलिप गार्डनमध्ये यंदा 68 प्रकारच्या ट्युलिप्सची लागवड चार नव्या जातीचे ट्यूलिप्स नेदरलँड येथून आणण्यात आले आहे. ट्युलिपची फुले सरासरी तीन ते चार आठवडे टिकतात. ट्युलिप गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात.