पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसमधून अवकाशात उड्डाण केले त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट दिल्यानंतर त्यांनी तेजसमधून हे उड्डाण केलं. तेजसमधून केलेल्या उड्डाणानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे अभिनंदन केले. दरम्यान मोदींनी उड्डाण केलेल्या या विमानाचे फोटोजही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत. तेजस हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे जे कोणत्याही हवामानात उडू शकते. हे दोन पायलट असलेले लढाऊ विमान आहे. त्याला लिफ्ट म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर म्हणतात. त्याला ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट असेही म्हणतात. म्हणजे गरज भासल्यास त्याच्या सहाय्याने हल्लाही केला जाऊ शकतो. हवाई दलाने एचएएलला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली असून त्यापैकी 26 विमाने देण्यात आली आहेत. हे सर्व तेजस मार्क-1 आहेत.