भारतातील रेल्वेचे जाळं हे जगातील चौथ्या क्रमांकाचे जाळं आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. एक ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? एका ट्रेनमध्ये विविध प्रकारचे कोच असतात. यामध्ये जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोच असतात. एक जनरल कोच तयार करण्यासाठी किमान एक कोटींचा खर्च येतो. एक स्लीपर कोच तयार करायला 1.5 कोटींचा खर्च येतो. एक एसी कोच तयार करायला दोन कोटींचा खर्च येतो. एका इंजिनची किंमत 18 ते 20 कोटी असते.