जेव्हा एखाद्या नदीची चर्चा होते तेव्हा सर्व प्रथम तिच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला जातो.

भारतातील नद्या अतिशय घाणेरड्या असल्याचीही अनेकांची सतत तक्रार असते.

पण भारतात एक अशी नदी आहे, जी केवळ स्वच्छतेमुळे ओळखली जाते.

या नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि निर्मळ आहे की, त्यातील खाली असलेले दगड आरामात दिसू शकतात.

तसेच या नदीचे पाणी दिसायला काचेसारखे आहे.

तुम्हाला माहितीये का अशी कोणती नदी आहे?

या नदीचे नाव उमनगोट आहे.

उमनगोट नदीला डौकी असेही म्हणतात.

डौकी हे एक छोटे शहर आहे, जे भारत-बांगलादेश सीमेवर आहे.

उमनगोट ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी मानली जाते, जी दिसायला काचेसारखी आहे.