पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.

त्यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधित केलं.

त्यावेळी मोदी म्हणाले की, मी एक कुटुंबातील सदस्य म्हणून आलोय आणि 130 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलोय.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमच्याकडून मी एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. देशाची सेवा करण्याचं सौभाग्य सर्वांना नाही मिळत.

तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला असं वाटतंय की, तुम्ही दृढ निश्चयानं भरलेले आहात आणि हा निश्चय आणि पराक्रमाचा आत्मा भारत मातेचं संरक्षण कवच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

मोदी आज काश्मीरच्या नौशेरा इंथ दाखल झाले होते.

लष्कर प्रमुख एम.एम.नरवणे हेही मोदींसोबत होते.

सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेराच्या ब्रिगेडनं भूमिका निभावली आहे

त्यामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात अभिमान आहे.