बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...

दिवाळीनिमित्त विठुरायाची राऊळी सजली

आज अश्विन अमावस्या अर्थात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन.

दिवाळीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला बीडच्या एका विठ्ठल भक्ताकडून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

आज दिवाळीची पहिली अंघोळ म्हणजेच, नरकचतुर्दशी असल्यानं आजपासून विठुरायाची दिवाळी देखील सुरु झाली आहे.

आज बीड येथील विठ्ठल भक्त करण हनुमंत पिंगळे यांनी ही आकर्षक फुलं सजावटीची सेवा अर्पण केली आहे.

या फुल सजावटीसाठी झेंडू, शेवंती, गुलछडी, विविध रंगीबेरंगी गुलाब, अँथेरियम, ऑर्केड, कामिनी, तुळस यांचा वापर करण्यात आला आहे.

या सजावटीमध्ये फुलांचे पडदे, फुलांच्या पायघड्या, फुलांचे आकाशदिवे आणि पणत्या बनविण्यात आले आहेत.


विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी ही फुलांची आकर्षक सजावट केली आहे.