टेस्ला (Tesla)चे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी संपत्तीत एक नवा इतिहास रचत वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती आता $335 अब्ज इतकी आहे, जी प्रसिद्ध अब्जाधीश वॉरन बफेच्या संपत्तीच्या तिप्पट आहे.
जर तुम्ही भारतीय अब्जाधीशांची तुलना केली तर इलॉन मस्क यांनी गेल्या 24 तासांत DMart च्या राधाकृष्ण दमानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त कमाई केली आहे.
दमानी यांची एकूण संपत्ती सध्या $23.9 अब्ज असून ते भारतातील 5 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे श्रीमंत आहेत. तर मुकेश अंबानी पहिल्या, अदानी दुसऱ्या, अझीम प्रेमजी तिसऱ्या आणि शिव नाडर चौथ्या क्रमांकावर आहेत.
टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमात वाढ झाल्यामुळे एलोन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे
टेस्ला इंक.च्या शेअरमध्ये मोठ्य़ा प्रमाणात वाढ झाल्याने इलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
सोमवारी त्यांची संपत्ती 24 अब्ज डॉलरने वाढली.
इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्लाच्या शेअर्समध्ये 8.5% वाढ झाली आहे.