वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय



या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधील एक अप्रतिम लढत पाहायला मिळाली.



एक रोमहर्षक विजय काय असतो हे न्यूझीलंडने दाखवून दिलं.



केवळ एका रनच्या फरकाने इंग्लंडला किवी संघानं पराभूत केलं.



सर्वात आधी फॉलोऑन मिळूनही 258 धावाचं तगडं लक्ष्य किवी संघानं इंग्लंडला दिलं.



ज्यानंतर अवघ्या एका धावेच्या फरकाने सामना जिंकून न्यूझीलंडने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.



फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना जिंकणारा न्यूझीलंड हा तिसराच जगातील संघ ठरला आहे.



न्यूझीलंडसाठी केन विल्यमसननं झळकावलेलं शतक आणि नील वॅगेनरची अखेरच्या डावातील गोलंदाजी महत्त्वाची ठरवी,



इंग्लंडसाठी जो रुटनं पहिल्या डावात नाबाद 153 तर दुसऱ्या डावात 95 धावा केल्या.



न्यूझीलंडच्या विजयामुळे ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.