PM Modi at Tirupati : पंतप्रधान मोदी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले. पंतप्रधानांनी तिरुपती बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदींनी तिरुपती मंदिरात प्रार्थनाही केली, याचे फोटो समोर आले आहेत. पंतप्रधान मोदी रस्ता मार्गे तिरुमला येथे पोहोचले, यावेळी लोकांनी ठिकठिकाणी त्यांच्या नावाने घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांनी रस्त्याच्या कडेला उभ्या लोकांचं अभिवादन स्वीकारलं. पंतप्रधान मोदी रविवारी तिरुमला येथे पोहोचले आणि रात्र तेथेच घालवली. यानंतर, सोमवारी सकाळी पंतप्रधान मोदी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले त्यानंतर ते तेलंगणासाठी रवाना होतील. तेलंगणात 30 नोव्हेंबरला विधानसभेच्या 119 जागांवर मतदान होणार असून, त्याचा निकाल 3 डिसेंबरला आहे. तेलंगणापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. या चार राज्यांचे निवडणूक निकालही 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. तेलंगणात निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी दौरा करत आहेत.