Kosi River : सरड्याच्या रंगाप्रमाणे 'ही' नदी वारंवार आपला मार्ग बदलते



Sorrow of Bihar : सरडा रंग बदलतो हे तुम्ही ऐकलं असेल, पण भारतातील एक नदी आहे जी वारंवार आपला मार्ग बदलते.



बिहारमधील कोसी नदी आपला मार्ग बदलण्यासाठी ओळखली जाते.



चीन, नेपाळ आणि भारतातून वाहणारी ही नदी वारंवार आपला मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे.



तिबेटमधील ग्रेट हिमालयाच्या उतारावरून उगवणारी कोसी नदी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ आणते.



नेपाळमधून जाताना आणखी गाळ गोळा होतो, त्यामुळे नदी पात्रात गाळ आणि वाळूचा मोठा थर तयार होतो.



जेव्हा नदी मैदानी प्रदेशात पोहोचते तेव्हा हा गाळ साचतो आणि बांधाप्रमाणे अडथळे तयार होतात, ज्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा येतो.



हा गाळ कोसी नदीचा मार्ग बदलण्याचं कारण आहे.



मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे नदीच्या प्रवाहात अनेकदा अडथळा निर्माण होतो.



नदीपात्रात गाळ अडकल्यामुळे, पाण्याला जसा पर्यायी मार्ग सापडतो, त्याप्रमाणे नदीची दिशा बदलते.



नदी आपला वेगळा मार्ग शोधते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होते आणि आजूबाजूच्या गावांना त्याचा फटका बसतो.