येत्या काळात आपण 'पंचप्रण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले



विकसित भारत

पहिलं प्रण म्हणजे विकसित भारताचं. आता देश एक मोठा संकल्प घेऊन चालेल आणि तो मोठा संकल्प विकसित भारताचा आहे.

गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका

दुसरं प्रण म्हणजे आपल्या मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीचा एकही अंश राहू देऊ नका

आपल्या वारशाचा अभिमान बाळगा

तिसरे प्रण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा

एकतेचं सामर्थ्य

चौथं प्रण म्हणजे एकता आणि एकजुटता. 130 कोटी देशवासियांमध्ये एकता असावी

नागरिकांची कर्तव्ये

पाचवं प्रण हे नागरिकांचे कर्तव्य आहे. यात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचाही समावेश आहे.

आज संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचं उत्साह पाहायला मिळत आहे.



यंदाचा स्वातंत्र्यदिन अधिक खास आहे कारण आपण स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन नवव्यांदा ध्वजारोहण केलं.