देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 262 रुग्णांची वाढ झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे दिल्लीमध्ये वाढता संसर्ग पाहता पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के तर, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.44 टक्के आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात 18 हजार 53 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत देशात एकूण 4 कोटी 35 लाख 73 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून सध्या देशात 1 लाख 23 हजार 535 सक्रिय कोरोनाबाधित आहेत