देशात गेल्या काही दिवसांपासून वाढता कोरोना संसर्ग पाहता दिलासादायक बातमी आहे



देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे



देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली, ही एक दिलासादायक बातमी आहे



गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे



दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे



गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत



देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत



भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे



गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे