देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहेत



देशात शनिवारी दिवसभरात अर्थात गेल्या 24 तासांत 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे



आदल्या दिवशी शुक्रवारी देशात 15 हजार 815 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती



याच्या तुलनेनं नव्या आकडेवारीनुसार, नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 1,723 रुग्णांची घट झाली आहे, ही चांगली बाब आहे



देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 81 हजार 861 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 88 कोटींहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत



देशात शनिवारी दिवसभरात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा जास्त आहे



गेल्या 24 तासांत 16 हजार 454 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत



देशात एकूण 4 कोटी 36 लाख 9 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे. आता देशात 1 लाख 16 हजार 861 कोरोना रुग्ण आहेत.



शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 28 लाख 1 हजार 457 डोस देण्यात आले आहेत.



देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.69 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 4.57 टक्के आहे.



देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे.