गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लतादीदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने मानवंदना दिली आहे.

सुमन दाभोलकर यांनी दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्टोन आर्ट साकारून त्यांना मानवंदना दिल्या आहेत.

लतादीदींच्या दैवी सुरांनी भारतीय संगीताला जगभरात ओळख मिळवून दिली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.