नुकतेच हिना खानने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाने निऑन टॉप आणि लेगिंग्ज परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये हिना खान योगा मॅटवर बसून सिझलिंग पोज देत आहे. यामध्ये हिना खानचा अतिशय आकर्षक लूक पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करताना हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आरोग्य ही संपत्ती आहे.' हिना खानचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हिना खानच्या या फोटोंना तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोंमध्ये हिना खान मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे.