प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं चांगलं की वाईट? याबाबत आज जाणून घेऊयात...



अनेक प्रकारच्या प्लास्टिक बिसफेनोल ए (BPA) हे एक घातक रसायन आहे. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं.



त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती BPA विरहीत असेल, याकडे लक्ष द्या.



बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते.



काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकतं, मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते.



पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं.



जर तुम्ही लिंबू पाणी सोबत ठेवत असाल, तर काचेच्या बाटलीचाच पर्याय उत्तम ठरू शकतो.



लहान मुलांनाही काचेच्याच बाटलीतून दूध पाजणं फायदेशीर आहे.