नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते.



मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण होते.



कफ आणि दमा मधामुळे दूर होतो.



उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.



हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.



दररोज मध खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.



मधामुळे शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.



पिंपल्स दूर करण्यासाठी मध उपयोगी आहे.



उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.



पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करता येते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.