हिवाळा हा ऋतू प्रवासासाठी आणि सुट्टीत फिरण्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो.

त्यातच थंडीची सुंदर अशी चाहूल लागलेली असते त्यामुळे राज्यातील हिल स्टेशन पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात .

हिवाळ्यात मित्रपरिवार, कुटुंबा सोबत कुठे लांब फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या पर्यटन ठिकाणांबद्दल

महाबळेश्वर
महाबळेश्वर हे अतिशय सुंदर आणि निसर्ग सौन्दर्याने नटलेले एक ठिकाण आहे , हे राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण मानले जाते.

या ठिकाणी अनेक आकर्षीत पर्यटन ठिकाणे आहेत , जसे सिटी पॉईंट ,विल्सन पॉईंट , एल्फिस्टन पॉईंट , आर्थर पॉईंट आणि विविध मंदिरे आहेत.

माथेरान
माथेरान हे अतिशय सुंदर असे थंड हवेचे ठिकाण आहे,माथेरान मधील घनदाट जंगल आणि तेथिल नैसर्गिक संपदा याने पर्यटक येथे आकर्षित होतात .

ब्रिटिश काळात माथेरानला हिल पॉईंट अशी ओळख प्राप्त झालेली होती , येथे विविध डोंगर रांगा आहेत.

चिखलदरा
चिखलदरा हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे.
हे सातपुडा पर्वतरांगा मध्ये असलेले थंड हवेचे ठिकाण आहे .

या पर्वतरांगामध्ये पाहावयाला मिळतात येथे मंकी पॉईंट ,पंचोबल पॉईंट ,देवी पॉईंट , पंचकुंड ,करीकें पॉईंट अशा विविध पॉईंट

लोणावळा

लोणावळा हे ठिकाण पुणे जिल्हात आहे ,लोणावळा येथे असंख्य लहान मोठे धबधबे आणि मोठ्या प्रमाणात असलेली हिरवळ येथे अनुभवायला मिळते.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.