उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची कमी गरज भासते.
थंड वातावरणामुळे या ऋतूत आपल्याला इतर ऋतूंच्या मानाने कमी तहान लागते. पण, तहान कमी लागत असली तरी उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही भरपूर पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे.
आपली तहान आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी थेट संबंधित असते. कारण उष्ण प्रदेशातील लोकांना जास्त पाण्याची गरज असते.
जर तुम्ही एसीमध्ये बसून काम करत असाल तर तुम्हाला बाहेर उन्हात काम करणाऱ्यांपेक्षा तुलनेने कमी तहान लागते.
तुमच्या तहानेचा तुमच्या वयाशीदेखील संबंध असतो. म्हणजेच, लहान मुलांना पाण्याची जास्त गरज असते.
जसजसं आपलं वय वाढत जातं त्यानुसार पाण्याची गरज तुलनेने कमी भासते.
अनेक प्रकारच्या आजारांमध्ये रुग्णांना जास्त पाणी लागते. गरम औषधांच्या सेवनाने पाण्याचे सेवन अचानक वाढते.
आपल्या शरीराला दररोज 2 लीटर पाण्याची गरज आवश्यक आहे.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या, श्वासोच्छवासाच्या समस्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात
तुम्हाला तुमच्या तहानेच्या क्षमतेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी थर्मॉस सारख्या बाटलीत तुम्ही कोमट पाणी ठेवू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.