पपई व्हिटॅमिन सी आणि आवश्यक अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे त्वचेचेसाठी उपयुक्त ठरू शकते.



पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात आणि त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.



कोलेस्टेरॉल तुमच्या शरीराला विशेषतः तुमच्या हृदयाला अनेक प्रकारे नुकसान करू शकते.



त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.



पपईमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.



याव्यतिरिक्त, पपईमध्ये असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते यामुळेही हृदयाला होणारी हानी कमी होते.



पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.



हे फळ खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर आजारांपासून सुरक्षित ठेवता येते.



पपई वजन कमी करण्यास मदत करू शकते.



या फळामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, तर पपईमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते.