ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची चव फार कमी लोकांना आवडते पण या फळात आरोग्याचा खजिना असतो. सीताफळा हे फळ गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते. सीताफळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करते . तसेच हे फळ शारीरिक कमकुवतपणा दूर करते.या फळात फायबर असते जे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करते. सीताफळाचे सेवन केल्याने पोट लवकर साफ होते आणि पचनसंस्था मजबूत होते. सीताफळ मनाला थंडावा देण्याचे काम करते,याच्या सेवनाने चिडचिडेपणा दूर होतो आणि नैराश्य दूर होते. त्यामुळे मानसिक शांती राखण्यासाठी सीताफळाचे सेवन केले पाहिजे. सीताफळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम संतुलित प्रमाणात आढळतात,त्यामुळे हे फळ हृदयरोग्यांसाठीही फायदेशीर आहे. टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.