तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 धावांनी गमावला. ज्यानंतर आता मालिकेतील आव्हान जिवंत ठेण्यासाठी भारत दुसरा सामना खेळणार आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडिय चील करताना दिसत आहे. शुभमननेही त्याच्या ट्वीटर तीन फोटो शेअर केले आहेत. यात तो, ईशान किशन आण शिखर धवन यांच्यासोबत निवांत मूडमध्ये दिसत आहे. या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. पहिल्या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करुनही फलंदाज फेल झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे भारताचा दिग्गज खेळाडू असलेला संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे.