भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिला टी20 सामना भारताने जिंकला आहे. आता दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली असून सध्या कून सराव करत आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यांच्यात टी20 मालिकेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना भारताने 8 विकेट्च्या फरकने जिंकला. त्यानंतर आता दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवलं. खासकरुन युवा गोलंदाज अर्शदीपनं कमाल गोलंदाजी केली. दीपक चाहरनंही त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही संघाकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.