अभिनेत्री हंसिका मोटवानी लग्नाच्या विषयावरून चर्चेत आली आहे. हंसिका आणि वाद हे नातं जुनं आहे. ती तिच्या लव्ह लाईफबद्दलही चर्चेत आली होती. अभिनेता सिलांबरासनसोबत तिचे अफेअर होतं, पण ते टिकलं नाही. प्रौढ दिसण्यासाठी तिने ग्रोथ हार्मोन्स घेतल्याचा आरोप होत होता. माह चित्रपटाच्या पोस्टरवर साध्वीच्या भूमिकेतील हंसिका चिलिम ओढताना दिसली होती. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप तिच्यावर होता. 2015 साली हंसिकाचा एक MMS लीक झाल्याचं सांगितलं जात होतं. हंसिकाने तो MMS तिचा नसल्याचा दावा केला. हंसिका 4 डिसेंबर रोजी सोहेल कथुरियासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.