देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा या रतन टाटा यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटासाठी संपूर्ण रिसर्च करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शिका सुधा या उत्सुक आहेत. रिपोर्टनुसार, या चित्रपटात रतन टाटा यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी दाखवण्यात येणार आहेत, ज्या अनेकांना माहित नसतील. सध्या फिल्म मेकर्स या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगला 2023 मध्ये सुरुवात होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्या बायोपिकमध्ये रतन टाटा यांच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन किंवा अभिनेता सूर्या यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. रतन टाटा यांची भूमिका या चित्रपटात कोणता अभिनेता साकारेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल, असं म्हटलं जात आहे. रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.