बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यानेही लाखो चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. बॉलिवूडसोबतच तमन्नाने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 2005 सालापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या तमन्नाला खरी प्रसिद्धी 2015 साली आलेल्या 'बाहुबली' या बिग बजेट चित्रपटातून मिळाली. तमन्नाचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार आतूर असतात. अभिनेत्री तमन्नाने स्टायलिश आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तमन्ना खूप ग्लॅमरस दिसत आहे. ब्लॅक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये तमन्ना भाटिया फारच सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड इअररिंग्स घातले आहेत. तमन्ना लाईटच्या मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह खूप ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 32 वर्षांची आहे. तमन्नाचा जन्म सिंधी कुटुंबात झाला, तिचे वडील संतोष भाटिया हिरे व्यापारी तर आई रजनी भाटिया गृहिणी आहे. 2005 साली तमन्नाने 'चाँद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.