बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरूण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून 25 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.
क्रिती सेननचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्लीमध्ये पंजाबी कुटुंबात झाला. क्रिती सध्या 32 वर्षांची आहे.
क्रिती सेनन हिनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिती तिची प्रत्येक भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते.
क्रितीने दिल्लीमध्ये शिक्षण पूर्ण केलं. कृतीने बी.टेक पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
2014 साली ‘हीरोपंती’चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
‘हीरोपंती’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छिपी’, ‘हाउसफुल 4’, ‘दिलवाले’ आणि ‘मिमी’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून क्रितीने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कलेची छाप पाडली आहे.
क्रिती सेननचा स्वत:चा फॅशन अँड क्लोदिंग ब्रँड आहे. Ms.Taken आणि The Tribe हे क्रिती सेननचे ब्रँड आहेत.
क्रिती सेनन हिने बॉलिवूडसह तेलगू चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
क्रिती सेननची बहिण नुपूर सेनन ही सुद्धा एक अभिनेत्री आहे.