गेल्या कित्येक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता दिसून येतेय. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर आहेत. आज 09 मार्चला देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील किमती स्थिर असून कोणतीही घट अथवा वाढ झालेली नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपयांनी विकलं जातंय पुण्यात पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय औरंगाबादेत पेट्रोल 108 रुपये, तर डिझेल 95.96 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर आहे.