गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींत 0.15 टक्क्यांच्या किंचित वाढीसह, ते प्रति बॅरल 85.12 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, 0.11 टक्क्यांच्या वाढीनंतर ते प्रति बॅरल 80.70 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत किंचित वाढ झालीये. देशातील चारही महानगरांमध्ये दर स्थिर आहेत. आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतीय तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेत. आज सलग 322व्या दिवशी इंधनाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये, तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये, तर डिझेल 94.24 रुपये आहे.