गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालीये. तेल उत्पादक देशांचा समूह असलेल्या OPEC नं मे 2023 पासून तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 84.91 डॉलरवर पोहोचली आहे जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल 80.50 डॉलरवर पोहोचली आहे. आज देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आणि 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर आहे.