आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नाही.



आरबीआयच्या या निर्णयामुळे बाजारात तेजी दिसून आली.



सेन्सेक्स 143 अंकांच्या तेजीसह 59,832 अंकांवर स्थिरावला.



निफ्टी निर्देशांक 42 अंकांच्या तेजीसह 17,599 अंकांवर बंद झाला.



बँकिंग, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेट सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.



ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, आयटी सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.



डॉलरच्या तुलनेत रुपया वधारून 81.89 रुपयांवर स्थिरावला.



टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एसबीआय, एचडीएफसी आदींचे शेअर्स वधारले.



एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा आदींच्या शेअर्समध्ये घसरण झाली.



आज तेजीमुळे मार्केट कॅप 1.06 लाख कोटींनी वाढून 262.37 लाख कोटी इतके झाले.