आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आजही कायम.

WTI क्रूड 0.20 टक्क्यांनी घसरून 71.52 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करतंय.

ब्रेंट क्रूड 0.17 टक्क्यांनी घसरलं आहे आणि 75.19 डॉलरनं विकलं जातंय.

देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.

जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

आजही देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.