देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या नव्या किमती जाहीर केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरलेत आंतरराष्ट्रीय बाजारात, WTI क्रूड 0.52 डॉलर म्हणजेच, 0.68 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 76.26 डॉलरवर व्यापार करतंय. ब्रेंट क्रूड 0.53 डॉलर म्हणजेच, 0.66 टक्क्यांनी खाली 79.80 डॉलरवर व्यवहार करतंय. देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.