देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आज स्थिर आहेत. देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. बहुतांश ठिकाणी डिझेलच्या दरानं प्रति लिटर 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेले आहेत. मे 2022 पासून देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कायम आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.