महाराष्ट्र दिनानिमित्त आज भारतीय शेअर बाजारातील व्यवहार बंद. 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शेअर मार्केट बंद. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये आज ट्रेडिंग नाही. आज संपूर्ण दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत तसेच, पुढील ट्रेडिंग सत्र मंगळवार, 2 मे 2023 रोजी असणार आहे. आज बीएसईमध्ये इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि SLB सेगमेंटमध्येही व्यवहार होणार नाहीत. बीएसईमध्ये आज करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटवरही व्यापार होणार नाही महाराष्ट्र दिनानिमित्त आज भारतीय शेअर बाजारातील सर्व विभागांमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स सेगमेंटमधील ट्रेडिंग आज सकाळच्या ट्रेडिंग सत्रात बंद राहील. सायंकाळी 5 वाजता मात्र कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स सेगमेंटमधील ट्रेडिंग सत्र सुरू होईल.