आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. सर्वसामान्यांच्या नजरा बजेटकडे लागल्यात.

पेट्रोल-डिझेलवर काही सवलत मिळू शकते का? याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केलेत.

आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थेच आहेत.

राज्यातही गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

औरंगाबादमध्ये पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर आहे.

परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर आहे.

कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.