गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होतेय.
सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत आहे. याचं कारण म्हणजे जेव्हापासून अमेरिकन मध्यवर्ती बॅंकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली तेव्हापासून डॉलर मजबूत झाला आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,280 रुपयांवर गेला आहे.
आज एक किलो चांदीचा दर 68,820 रूपयांवर गेला आहे.
भारतात लग्नराईचे दिवस सुरु आहेत. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागतोय.
सोन्या-चांदीचे वाढलेले हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीतही सारख्याच प्रमाणात आहेत.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता.
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.